नाशिक दि.२८ (बातमीदार) महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या संपादकांची संस्था दिवा प्रतिष्ठान दादर ,मुंबई येथे कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकरणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी चंद्रकांतदादा शेवाळे, उपाध्यक्ष म्हणून आवाजचे संपादक भारतभूषण पाटकर, कार्याध्यक्षपदी सुनिल गायकवाड , कार्यवाहपदी विवेक मेहेत्रे खजिनदार म्हणून विजय पाध्ये तर नाशिक विभागाचे प्रमुख म्हणून सुभाषितचे संपादक सुभाष सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. इतर कार्यकारीणी पुढीलप्रमाणे सहकार्यवाह सोनल खानोलकर, शारदा धुळुप अलिबाग विभाग, ॲड.धनंजय सिंहासने कराड-सातारा, श्रीमती निलिमा कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, शिवाजी धुरी, मोतीराम पोळ, हेमंत रायकर. या कार्यकारीणीची घोषणा अध्यक्ष चंद्रकांतदादा शेवाळे, सुनिल गायकवाड, विवेक मेहेत्रे, विजय पाध्ये यांनी परीपत्रकाद्वारे केली आहे. या राज्य कार्यकारिणीमध्ये नाशिकच्या सुभाष सबनीस यांची निवड झाल्याबद्दल नाशिक कवीचे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर, भोसला चे कार्याध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, प्रकाशक संघाचे विलास पोतदार, वसंतराव खैरनार, कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, रविंद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले, सुरेश पवार, दिगंबर काकड,यांनी अभिनंदन केले आहे.
