प्रतिनिधी : कलाकारांविषयी नेहमीच वावड्या उडत असतात. आम्ही त्याविषयी दुर्लक्ष करीत असतो. शिवाय माझ्या घरच्यांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे मी शांत होते. त्यामुळे मी माझ्या चारित्र्यावरच एक्सप्लनेशन देण्यासाठी पुढे यावे अशी गरज आपल्याला वाटली नाही. आज असे स्पष्टीकरण देण्याची वेळ माझ्यावर परंतू लोकप्रतिनिधी जेव्हा असे चिखलफेक करणारे आरोप करतो. तेव्हा आपल्याला पुढे यावे लागले असे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सांगितले.लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडायचे असतात. लोकप्रतिनिधींनी आपले रक्षण करावे अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे. त्यांनीच अशा प्रकारे चिखलफेक केल्याने मला आपल्या पुढे यावे लागले. काल जर ते काही बोलले नसते तर मी तशीही शांत बसले होते. परंतू जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी असतो. तो हजारो लाखोंचे नेतृत्व करीत असतो. लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अनुयायांना ही गोष्ट खरी आहे असे वाटते म्हणून ती खोडून काढण्यासाठी आपण प्रसारमाध्यम समोर आल्याचे माळी यांनी सांगितले. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही राजकीय कुरघोडी करताना आम्हा कलाकारांना का यात ओढता. बीडमध्ये काही तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना कलाकारांवर गाडी का घसरते ? असा सवाल प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
