Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या आजारी बहिणीची केली विचारपूस …

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या आजारी बहिणीची केली विचारपूस …



कुडाळ(अजित जगताप) : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून काल कुडाळ ता. जावली येथे जंगम हॉस्पिटलमध्ये जाऊन निष्ठावंत कार्यकर्ता व एका बांधकाम व्यवसायिक यांच्या आजारी बहिणीची भेट घेतली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद जंगम यांच्या कडून लाडक्या बहिणीच्या उपचार व तब्येतीबद्दल माहिती घेऊन विचारपूस केली.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील बांधकाम व्यवसायिक यांची ४७ वर्षाची सखी बहीण बरेच दिवसापासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. व्यवसाय सांभाळून मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा एक कार्यकर्ता आपल्या आजारी व लाडक्या बहिणीची काळजी घेत आहेत. तसेच त्यांच्या औषध उपचारसाठी स्वतः झटत आहेत. अशा कार्यकर्त्याचे नैतिक बळ पाहून स्वतः मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या लाडक्या बहिणीचे कुडाळ येथील जंगम हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या औषध उपचाराबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला.
. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या आजारी बहिणीची देखभाल तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जावळी तालुक्यातील प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या प्रचारामुळे मताधिक्यामध्ये वाढ झालेली आहे. याची जाणीव ठेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा वेळ काढून कुडाळ येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या कार्यकर्त्याच्या बहिणीची भेट घेतली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रमोद जंगम यांच्या कडून उपचारा बाबत माहिती घेतली . तसेच रक्ताचे नाते नसले तरी माणुसकीचे नाते जपणारी आपलीच बहीण मानून कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना भेटून दवा आणि दुवा कामी यावा यासाठी मनोभावे दिलासा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी बनली आहेत . जात व धर्म न पाहता कार्यकर्ता हेच माझे कुटुंबं मानून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या विचाराचे अनुकरण इतर कार्यकर्त्यांनी करावे अशीच ही घटना आहे. राज्याचा कॅबिनेट मंत्री हे स्वतः हॉस्पिटल मध अत्यंत साधेपणाने आलेले पाहून अनेकांना त्यांच्या साधेपणाचा अनुभव आला. राजासारखे मन मनासारखा राजा याची प्रचिती आल्याची माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली.
——-&——————————————-
फोटो -जग्गम हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्याच्या बहिणीचे विचारपूस करताना मंत्री व वैद्यकीय अधिकारी (छाया- अजित जगताप कुडाळ)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments