सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन व एक उपाध्यक्ष पद असा भर गच्च अनुशेष भरून काढला आहे. यानिमित्त कॅबिनेट मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नामदार मकरंद पाटील यांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू व संविधानाची प्रत भेट देऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी सत्कार केला. या सत्कार सोहळ्याने मंत्री महोदय सुद्धा भारावून गेले.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व मागासवर्गीय वाड्या- वस्तीमध्ये जाऊन प्रचार केला. तसेच भविष्यात मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये विकास कामांसाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले होते. त्यामुळे महायुतीला यश मिळाले आहे. अशा शब्दात मंत्रिमहोदयांनी श्री उबाळे यांचा गौरव केला आहे.
हा सत्कार म्हणजे खऱ्या अर्थाने मागासवर्गीय बांधवांनी टाकलेला विश्वास आहे. त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना मागासवर्गीय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सहकार्य कायम स्मरणात राहणार आहे. लवकरच स्थानिक पातळीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या प्रामाणिक व होतकरू कार्यकर्त्यांना शासकीय कमिट्यावर संधी दिली जाईल. असे मंत्री महोदयांनी सांगितल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. तसेच पीपल रिपब्लिकन पार्टीच्या विस्तारासाठी ही महायुती विशेष प्रयत्न करेल. यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे असं श्री रमेश उबाळे यांनी नमूद केले. सत्कार सोहळ्याला सातारा शहर, कोरेगाव, वाई ,खंडाळा, कराड, महाबळेश्वर, पाटण, माण, खटाव, दहिवडी, फलटण, वडूज, पाचगणी, जावळी, सायगाव, आनेवाडी, मोरघर कुडाळ करहर केळघर, खेड, प्रतापसिंह नगर, शाहूपुरी, शाहूनगर, करंजे येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
