Friday, May 9, 2025
घरदेश आणि विदेशमाजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मुंबई :- माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments