Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रबृहन्मुंबईमधील होमगार्डच्या 2771 रिक्त जागा भरणार;10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बृहन्मुंबईमधील होमगार्डच्या 2771 रिक्त जागा भरणार;10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

   मुंबई : बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा, असे आवाहन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments