प्रतिनिधी : सेंट अग्रसेन हायस्कुल अॅन्ड ज्युनि. कॉलेज कळवा ठाणे येथील हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा प्राथमिक / माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा “उडान लो छू लो आसमान” हा सांस्कृतिक कार्यक्रमांचा

जल्लोष दि. २३ आणि २४ डिसेंबर रोजी हायस्कुलच्या सभागृहामध्ये पार पडला .
यावेळी प्रमुख उपस्थिती व अतिथी म्हणून लायन्स क्लबचे लायन ललितजी, लायन चेतनजी, शाळेचे संस्थापक डॉ.पवन अग्रवाल, जीवनदीप एज्यु मिडियाचे मॅनेजर गोरखनाथ पोळ, DDM न्यूज चॅनलचे संपादक भिमराव धुळप, AGI चे शिक्षण निरिक्षक रमेश संकपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .सोबत AGI संस्थेचे CEO पियुश अग्रवाल,आकाश अग्रवाल हे उपस्थित होते .
तसेच संस्थेच्या कामोठे व विक्रोळी येथील शाळांचे मुख्याध्यापक अशोक परदेशी , सौ. रांजणे मॅडम, जिरे मॅडम तसेच संस्थेचे हितचिंतक तथा समन्वयक रविंद्र सावंत सर ,यांनीही उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी हिंदी माध्यमाचे मुख्याध्यापक दिनेश यादव सर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोलप मॅडम आणि समन्वयक श्रीमती लता मेहता मॅडम या सर्वांनी आपल्या सर्वच सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने मेहनत घेतली .