Thursday, October 16, 2025
घरमहाराष्ट्रसत्यवान मंडलिक यांना स्व.राजाराम डाकवे(तात्या )साहित्य पुरस्काराने सन्मानित

सत्यवान मंडलिक यांना स्व.राजाराम डाकवे(तात्या )साहित्य पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी – पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या प्राइड ऑफ स्पंदन अवार्ड कार्यक्रमाचा सोहळा कराड येथे पार पडला त्यावेळी सत्यवान मंडलिक यांना स्व.राजाराम डाकवे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री गुरु ष.ब्र.प्र.१०८ राष्ट्रसंत पद्मभास्कर डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज (मठाधिपती तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर ता.पाटण, जि.सातारा महाराष्ट्र) मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, सुप्रसिध्द पार्श्व गायिका कविता राम, सुप्रसिध्द मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, सुप्रसिध्द अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगिता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री, रील स्टार अंजली आकळे, शिवम असोसिटसचे गुलाब जाधव, डॉ.संदीप डाकवे व अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
पुरस्कार सोहळयाचे हे सहावे वर्ष होते.
या कार्यक्रमात प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी साहित्य भूषण मा. सत्यवान मंडलिक यांना ‘म्हातोबाचा माळ’ या कथा संग्रहासाठी स्व. राजाराम डाकवे (तात्या) पुरस्काराने गुरु ष.‌ब्र.प्र.१०८ राष्ट्रसंत पद.मभास्कर डॉ निलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सुप्रसिद्ध पार्शगायिका कविता राम, संदिप डाकवे व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप डाकवे यांनी करताना व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख मान्यवरांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन शितल दवणे यांनी केले.कार्यक्रमाचे शेवटी धगधगती मुंबईचे मुख्य संपादक भीमराव धुळप यांनी आभार प्रदर्शन केले.तसेच विशाल डाकवे, सुरेश मस्कर, विकास डाकवे, सौ. रेश्मा डाकवे, सौ. वनिता डाकवे, सौ. सुमन डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, अक्षता डाकवे, विकास साळुंखे, संतोष करपे, अनिल देसाई, सीमा देसाई, समाधान पाटील, विठ्ठल डाकवे, भरत डाकवे, रोहित जंगम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments