पुसेगाव( अजित जगताप) : राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार भगवानराव गोरे यांचे क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कुलभूमीत भूमिपुत्रांच्या वतीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले. नायगाव येथे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकानंतर त्यांनी सर्व युगापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून खऱ्या अर्थाने समता मानणारा मंत्री म्हणून ख्याती मिळवल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
यावेळी माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर फलटणचे आमदार सचिन कांबळे- पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या सह भूमिपुत्र किसन गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर प्रथमच महात्मा फुले यांच्या कुलभूमीत मंत्री म्हणून नामदार जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला जाऊन विनम्र अभिवादन केले. या वेळेला महात्मा फुले की जय घोष… करण्यात आला .माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने खटाव तालुक्यातील कटगुण कुलभूमीत महात्मा फुलेंचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. दि: ११ एप्रिल त्यांच्या पुण्यतिथी दिनी या ठिकाणच्या स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करण्याचा मानस यावेळी मंत्री गोरे यांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला.
अत्यंत भावनिकरित्या झालेल्या या सत्कार सोहळ्याला किसन गोरे,योगेश गोरे ,अमर गोरे, दत्ता गायकवाड, सुधीर गोरे, प्रल्हाद साळुंखे, अर्जुन गायकवाड, अभिजीत गोरे, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सौ शोभा गोरे, सौ कोमल गोरे, सौ माधुरी गोरे, सौ मीना गोरे व महिला वर्ग, युवक आणि पुरोगामी विचारांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी कुलभूमीला भेट दिल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानून सत्कार केला.
————-&———————————
फोटो कटगुण येथील फुले स्मारकाला अभिवादन करताना मंत्री जयकुमार गोरे (छाया- निनाद जगताप, कटगुण)
