Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी  :  साकीनाका येथील इडन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे श्री नित्यानंद गुरू एज्युकेशनल ट्रस्ट आणि श्रीगादी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवि नायर, राजेंद्र श्रीगादी, संध्या नायर आणि जगदीश कुंभार हे मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे उद्दिष्ट महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर निदानाच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सरशी प्रभावीपणे सामना करणे आहे.

शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, समाजसेवेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अनिल गलगली यांनी आपल्या भाषणात सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments