Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्र२९ डिसेंबरला धारावी मॅरेथॉनचे आयोजन

२९ डिसेंबरला धारावी मॅरेथॉनचे आयोजन

प्रतिनिधी :एकता सोशल वेल्फर सोसायटीच्या माध्यमातून रविवार दिनांक २९ डिसेंबर २०३४ रोजी सकाळी ६.०० ते ८.००  या वेळात सर्व वयोगटातील लोकांकरिता धारावी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गोल्ड फील्ड कंपाऊंड येथून करण्यात आले आहे. साधारण पाच किलोमीटरचे अंतर असेल त्यामध्ये विद्यार्थी युवक, जेष्ठ नागरिक, महिला सहभागी होऊ शकतात. स्पर्धेकरिता अल्प प्रमाणात नोंदणी फी घेतली जाणार आहे. स्पर्धा सकाळी ६.०० वाजता गोल्ड फील्ड कंपाउंड येथून सुरू होईल. पिवळा बंगला, टी जंक्शन, केमकर चौक मार्गे छोटा सायन हॉस्पिटल, कुंभारवाडा ९० फूट रोड, साईल हॉटेल मार्गे पुन्हा गोल्ड फील्ड कंपाऊंड असा असेल. यामध्ये साधारण आपल्या स्वेच्छेने दोन ते पाच किलोमीटर पर्यंत आपण मध्यम स्वरूपात चालू अथवा धावू शकता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या लोकांना अल्पोहर भेटवस्तू तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती  गणेशा मुतु, मुर्गेश मुत्तू यांनी दिली आहे.त्यांच्यासोबत  सतीश व्हटकर, लालबहादूर जयस्वाल, नर्सिंग व करण ही मंडळी त्यांना मदत करत आहेत. या मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी  केले आहे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments