Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवात समाजसेवेचा अनोखा संदेश!

संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवात समाजसेवेचा अनोखा संदेश!

प्रतिनिधी : दादर येथे काल संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक नानजी भाई ठक्कर ठाणावाला, दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, नामवंत उद्योजक नवीनभाई ओटी, सिनेगायिका व स्टार मयुरी सोनी आणि संस्थेचे अध्यक्ष प्रविणजी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कॅन्सरग्रस्त महिलांसाठी आयोजित विशेष साडी आणि मिठाई वाटप उपक्रम. एन.के.टी. समूहाच्या वतीने 700 महिलांना साड्या व मिठाई वाटप करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या शुभहस्ते हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण मिळवून देण्यासाठी भजन संध्या व गीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. या सुमधुर सादरीकरणामुळे परिसर भक्तीमय बनला होता.

समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाने उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजसेवेत योगदान देण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.के.टी. समूहासह अनेक स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी सहकार्य केले. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांनी समाजातील वंचित घटकांना आधार मिळतो, असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments