प्रतिनिधी : नेरूळ नगरीत वेगवेगळे उपक्रम घेऊन सतत चर्चेत असणारे तसेच वाढदिवस निमित्ताने हेल्मेट गिफ्ट करणारा आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले अध्यक्ष अखंड हरिनाम सप्ताह,अध्यक्ष शिव वाहतूक सेना नवी मुंबई यांच्यासमवेत संस्थापक अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14 वे यांच्या विशेष सहकार्याने वाढदिवसासाठी फुल गुच्छ न देता मोटार सायकल चालवताना आपले कुटुंब सुरक्षित रहावे आपण स्वतः सुरक्षित रहावे मोटरसायकल चालवताना रस्त्याने नेहमीच हेल्मेट घालावं असे सांगणारे व्यसनमुक्ती जनजागृतीचे अध्यक्ष आपला माणूस श्री आमले साहेब गेल्या अनेक वर्षापासून आगळे वेगळे उपक्रम साजरा करीत आहे याबद्दल त्यांना यावर्षीचा छत्रपती संभाजी राजे राज स्तरीय 2024 विशेष पुरस्कार मिळालेला आहे आजही त्यांनी युवकांना एक आगळीवेगळी दिशा दाखवली आहे कुठल्याही प्रकारचं फुलगुच्छ व बडे-जाऊ पणा न करता संरक्षण करण्यासाठी अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल च्यावतीने हेल्मेट गिफ्ट देऊन शेकडो युवक युवती तसेच लोकांसमोर आदर्श यांनी घडवून आणला आहे याबद्दल विभागातील सर्व नागरिक तसेच युवकांनी त्यांचे विशेष कौतुक केले व असेच आम्हाला यापुढेही आपण मार्गदर्शन करावे अशी भावना व्यक्त केली.
