Monday, October 27, 2025
घरमहाराष्ट्रउडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर...

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी

मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक कारकर ) : भूतलावर प्रत्येक व्यक्तीच्या अंगीकृत कलागुणांना व्यासपीठ मिळालं की, असंख्य सितारे जगासमोर येतात अशी अनेक उदाहरणे नेहमीच प्रत्येयाला येत असतात.राजीव गांधी विद्यालय,नालासोपारा ( प. ) येथे नुकत्याच पार पडलेल्या उडान फेस्टिव्हल मध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण ३६ शाळांनी सहभाग घेतला होता.या मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.गायन स्पर्धेत आर्या रामचंद्र गांगरकर ( इ.सहावी ) हिने वैयक्तिक तसेच समूह गायन अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर ही अभ्यासात अत्यंत हुशार असून शाळेय विविध उपक्रमांत ती कायम सहभागी होत असते.आर्या गांगरकर श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) ह्या मंडळाचे खजिनदार रविंद्र गांगरकर यांची ती भाची आहे.आर्याने गायलेलं गीत अगदी मोहून टाकणारे आहे.संगीत विभागाच्या शिक्षिका तृप्ती तांबे यांचे तिला अनमोल मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते उदय नेने,अभिनेत्री गायिका सायली गावंड तसेच हास्यजत्रा फेम निमिष कुळकर्णी युवा नेते सिध्दार्थ ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.आर्याच्या यशाचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments