Tuesday, October 28, 2025
घरमहाराष्ट्रग्लोकल कम्युनिकेशन्सचे संचालक भास्कर तरे यांचा स्पंदन चँरिटेबल ट्रस्टव्दारे “प्राइड ऑफ स्पंदन...

ग्लोकल कम्युनिकेशन्सचे संचालक भास्कर तरे यांचा स्पंदन चँरिटेबल ट्रस्टव्दारे “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वं. यंशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या पावन भूमीत दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी आणि सत्कारमुर्ती म्हणून डाँ.निळकंठ धारेश्वर महाराज तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्याहस्ते ग्लोकल कम्युनिकेशन्सचे संचालक भास्कर तरे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डाँ.संदिप डाकवे, पत्रकार भिमराव धुळप, पत्रकार, कवी गजानन तुपे, पार्श्वगायिका कविता राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भास्कर तरे यांचा जनसंपर्क क्षेत्रात माध्यम सल्लागार म्हणून एका खाजगी संस्थेत २००५ पासून सुरू झालेल्या प्रवासाला आज २० वर्ष पुर्ण झाली असून वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत रूग्णालये, तसेच इतर कंपनीच्या प्रतिमा संवर्धनाची जबाबदारी यशस्वीपणे कंपनीच्या माध्यमातून पार पाडली आहे. सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजू रूग्णांना ग्लोकल आणि वैयक्तिक स्वरूपात आजपर्यत अनेक रूग्णांना मदतीचा हात दिला. आज ग्लोकल कम्युनिकेशन्स देशभरात सेवा पुरवत असून बदलत्या काळाची गरज ओळखून आपल्या सेवा क्षेत्रात जनसंपर्क सेवेसह डिजीटल मार्केटींगचीही सेवा गेल्या २०१० पासून पुरवत असून २५ हून अधिक तरूणांना रोजागार उपलब्ध करून दिलेला आहे.

या पुरस्काराबाबत बोलताना भास्कर तरे म्हणाले की, आज हा पुरस्कार स्विकारताना खूप आनंद होत असून आरोग्य क्षेत्रात कार्य करताना आपल्या माध्यमातून अडी अडचणीत असणा-या रूग्णांना मदत होते त्याचे समाधान आहे. हे समाजकार्य तसेच जनसंपर्क क्षेत्रात सुरू असलेले अविरत काम आणि त्या माध्यमातून वैदयकीय क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ञ डाँक्टरांशी झालेली ओळख यामुळे करणे शक्य झाले. डाँ.संदिप डाकवे यांच्या स्पंदन चँरीटेबल ट्रस्टने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे. या पुरस्काराने अनेक गरजू रूग्णांसाठी सेवा करण्याची जबाबदारी अधिक वाढली असून त्यासाठी सर्वतोपरी मी सदैव प्रयत्नशील असेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments