सातारा(सोमनाथ पवार) : गेल्या वर्षी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी नागठाणे येथील घाडगे रुग्णालयात सौ नीलम बेंद्रे गर्भवती असताना प्रसुती वेळी त्या रुग्णालयातील डॉक्टर अनुपस्थित होते . तेथील कंपाऊंडरने डॉक्टर यांच्या सांगण्यावरून सौ निलम बेंद्रे यांची प्रस्तुती करतांना नूतन बाळ दागवले . यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रुग्णालयाचे वैद्यकीय परवाना तात्काळ रद्द करावा. अशी मागणी करण्यात आली होती. अखेर डॉ. घाडगे यांनी या विरोधात दाद मागितली. परंतु उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश कायम करून तपास अधिकाऱ्यांनी आदेशावर प्रभाव न पाडता तपास करावा. असा नमूद केल्याची माहिती मीरा-भाईंदर चे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती अशी की,
सौ नीलम सोमनाथ बेंद्रे, रा. नागठाणे ता. जिल्हा सातारा या गर्भवती राहिल्यानंतर पहिल्या महिन्यापासून घाडगे रुग्णालय, नागठाणे येथे उपचार घेत होत्या. उपचार घेत असताना नऊव्या महिना सुरु असताना त्यांना दि: १ फेब्रुवारी २०२३ रोजी पोटात दुःखु लागल्याने त्या पूर्वीपासून उपचार घेत असलेल्या घाडगे रुग्णालय नागठाणे येथे सकाळी ९:०९ वाजता दाखल झाल्या.
तिथे डॉक्टर उपस्थित नसल्याने उपस्थित कंपाउंडरने डॉक्टर यांच्या सांगण्यावरून गर्भवती असलेल्या सौ निलम बेंद्रे यांची प्रस्तुती केली . यामध्ये चुकीच्या प्रसूतीमुळे बाळ दगवल्याने दुर्देवी घटना घडली. .बेंद्रे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. सदर घटनेस कारणीभूत डॉ. विकास घाडगे व कंपाउंडर निलेश घाडगे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या घटनेची नोंद करून गुन्हा दाखल केला. या विरोध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात डॉक्टरांनी दाद मागितली होती.

पी व्हीं एक्सामिनेशन मेडिकल कायद्याप्रमाणे एखाद्या महिला नर्स, महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर
यांनी करणे आवश्यक आहे . मात्र नीलेश घाडगे यांनी पी व्हि एक्झामीनेशन केली .घाडगे रुग्णालय हे स्पेशलिस्ट रुग्णालय असताना त्या ठिकाणी २४ तास डॉक्टर थांबणे बंधनकारक असताना तिथे एकही निवासी डॉक्टर उपस्थित नव्हते.सदर महिला ही रुग्णालयात सकाळी ९:०९ दरम्यान आली असता डॉक्टर तब्बल १ तास २० मिनिटे उशिराने रुग्णालयात आले .हे घाडगे रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा मधे दिसून आले .डॉक्टर रुग्णालयात येण्यापूर्वीच बाळ मृत पावले. असा गंभीर आरोप बेंद्रे कुटुंबीयांनी तसेच माझी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी तक्रारीत केला असल्याची माहिती माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी याबाबत लेखी तक्रार व तोंडी माहिती देऊन सुद्धा अपेक्षित अशी कारवाई न झाल्याने अखेर माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान, याबाबत घाडगे रुग्णालयात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही . त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
——————————————&&…
चौकट- या प्रकरणाबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालय आदेशाच्या निरीक्षण वर प्रभाव न पडता कायदेशीर रित्या या गुन्ह्याबाबत तपास करावा. असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याचे मीरा-भाईंदर चे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी इंग्रजी भाषेतील न्यायालयाच्या आदेशाचे मराठी रूपांतर करून पत्रकारांना सांगितले.
फोटो – गाडगे रुग्णालय नागठाणे याबाबत साताऱ्यात भरगच्च पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री बेंद्रे व सोमनाथ पवार
