Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रडाकेवाडी येथील श्री दत्त मंदीराचा मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहन समारंभ; दि.13, 14 आणि...

डाकेवाडी येथील श्री दत्त मंदीराचा मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहन समारंभ; दि.13, 14 आणि 15 एप्रिल, 2024 रोजी होणार संपन्न

प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे श्री दत्ताचे देवस्थान आहे. हे स्थान विभागामध्ये प्रसिध्द आहेे. या ठिकाणी दोन पारायणे तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमही मोठया उत्साहात संपन्न होतात. या श्री दत्त मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पुर्ण होत आले आहे. गावातील लोकांच्या अथक श्रमदानातून अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य स्वरुपाचे मंदीर तयार झाले आहे. या मंदीराचा मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहन सोहळा समारंभ शनिवार दि.13, रविवार दि. 14 आणि सोमवार दि. 15 एप्रिल, 2024 रोजी संपन्न होणार असून तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल पहायला मिळणार आहे.

शनिवार दि.13 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 8 ते 12 पर्यंत भरेवाडी ते डाकेवाडी मिरवणूक, दुपारी 1 नंतर महाप्रसाद, सायं.4 ते 7 श्री गणेश पुजन, पुण्याहवाचन, रात्री राक्षोहन होम, रात्री 8 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता ह.भ.प.धोंडीराम महाराज सवादेकर यांचे कीर्तन, रविवार दि.14 एप्रिल, 2024, सकाळी 9 ते 12 वास्तुशुध्दी, कुपोत्सर्ग होमहवन, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 ते 5 महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, दुपारी 4 ते 7 जलाधिवास, धान्यादिवास, रात्री 7 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता मणदूर येथील गोपालकृष्ण वारकरी ज्ञानमंदीर चे ह.भ.प.अनिल महाराज देवळेकर यांचे कीर्तन, सोमवार दि.15 एप्रिल, 2024 सकाळी 7 ते 11.30 पर्यंत मुर्तीस्थापना, कलशारोहन, श्री दत्तयाग महापुजा, आरती, प्रसाद, सकाळी 11.30 वाजता पाद्यपुजा व आशिर्वचन सत्कार समारंभ, दुपारी 1 वाजता महाप्रसाद इ. कार्यक्रम होणार आहेत. पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे 108 प.पूज्य श्रीमहंत मठाधिपती श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते कलशारोहन तर होमहवन सांगली येथील श्री क्षेत्र औदुंबर चे केदार प्रमोद जोशी यांच्या हस्ते होमहवन होणार आहे.

विशेष म्हणजे गावकऱ्यानी हे मंदिर श्रमदानातून उभे केले आहे. संपूर्ण गावाने यासाठी कंबर कसली होती. त्यामुळे लोकसहभाग आणि श्रमदान यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होय. प्रबळ इच्छाशक्ती आणि लोकांचे सातत्यपूर्ण श्रमदान याच्या जोरावर आज काळगाव विभागातील एक भव्य आणि दिव्य, देखणे मंदिराचे शिल्प डाकेवाडीत उभे राहिले आहे. श्रमशक्तीबरोबरच गावातील लोकांच्या मायेचा, आपुलकीचा ओलावा या मंदिरामध्ये आहे. तरी आपण या सोहळयासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ, श्री दत्त मंदीर जीर्णोध्दार समिती आणि समस्त ग्रामस्थ मंडळ, डाकेवाडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments