प्रतिनिधी : विकसित भारताची सुरुवात व्यक्तीच्या विकासाने होते, आम्हाला जुन्या मित्रांचा अभिमान आहे, नवीन तंत्रज्ञानाचा अभिमान आहे. आमचा वारसा आम्ही विसरलो होतो, आता आम्ही जागी झालो आहोत. गेल्या 10 वर्षांत देशाला आपल्या संस्कृतीचा आणि कलेचा अभिमान वाटू लागला आहे. याआधी लोक परदेशात गेल्यावर नावे बदलत असत, आता तशी परिस्थिती नाही. जगभर देशाचा मान वाढला आहे, पंतप्रधानांचे नेतृत्व बदलले आहे. देशातील प्रत्येक गरीबाला अन्न, वस्त्र, निवारा आणि शांतता मिळावी, हे रामराजांचे स्वप्न होते”, असं श्री श्री रविशंकर म्हणाले. मुंबईतील बोरिवली येथे गुरुदेव श्री श्री रविशंकर सत्संग विकास भारत कार्यक्रमाला आज 25 हजार लोकांची उपस्थिती लावली. या कार्यक्रमातून विकसित भारताचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार पीयूष गोयल, खासदार गोपाळ शेट्टी आणि बॉलिवूड गायक सोनू निगम यांनीही हजेरी लावली. सोनू निगमने यावेळी श्रीरामांचे भजनही गायले.
ज्यांना नकारात्मक भावना असतात ते जास्त सक्रिय असतात. यापासून दूर जावे लागेल, तरच आपण विकसित भारताचे स्वप्न पाहू शकतो. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक रविवार आणि शनिवारी मन की बात पाहिली असेल, पण तुम्ही ते देखील करू शकता. या दिवसात भारतात जेवढे काम झाले, मी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत पण माझ्या देशाच्या संस्कृतीच्या उन्नतीचे काम इतक्या वेगाने कुठेही झालेले नाही. मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रथम रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी करा”, असं आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केलं.
‘मतदान करणे हा आपला हक्क’
“संस्कृती आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी बाळगल्या तर भारताचा पूर्ण विकास होईल. लस सर्व देशामध्ये मोफत वाटली गेली, आपला देश प्रत्येकाला स्वतःचा मानणारा देश आहे. मुली वाचवा, मुलींना शिकवा, महिलांचा आदर करा. निवडणुका आल्या की मतदान करणे हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. जे मतदान करत नाहीत त्यांना विचारा की त्यांनी मतदान केले की नाही. आपल्या देशात चार खांब आहेत, पूर्वी ते दूरवर राहत असत, विकसित भारताचे छप्पर धरण्यासाठी हे चार खांब आवश्यक आहेत”, असं श्री श्री रविशंकर म्हणाले.
