पुणे (संजय सावंत) : पुणे येथील सामाजिक, शैक्षणिक, महिला सबलीकरण, बाल विकास क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वप्नाली सूर्यवंशी यांना प्राइड स्पंदन 2024 पुरस्कार जाहीर झालेला आहे. अशी माहिती स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्पंदन एक्सप्रेस चे संपादक संदिप डाकवे यांनी दिली आहे.
पुणे कात्रज या ठिकाणी स्वप्नाली सूर्यवंशी यांनी सूर्यवंशी एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केलेली आहे. अक्षर स्कूलच्या त्या संचालकाला असून सरस्वती महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळी उपक्रम राबवून महिला सबलीकारण्याची काम त्या करत असतात. सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षणाची सोय केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्राईड ऑफ स्पंदन2024 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वप्नाली सूर्यवंशी यांचे दिवशी तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे गाव आहे .त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
