सातारा(अजित जगताप) : क्रिकेटचा देव समजणारे भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी या दोन महान नेत्यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. परंतु प्रसारमाध्यमाशी दुरावा ठेवल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झालेला आहे. नैसर्गिक वरदान लाभलेल्या थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दौरा केला. प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर बानाजी यांच्या शापुर हॉल बंगला येथे सकाळी भेट घेतली. कौटुंबिक भेट असल्यामुळे खासदार राहुल गांधी यांनी डॉक्टर बालाजी कुटुंबियाची भेट घेऊन पुण्याला रवाना झाले. सातारा जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला फारसं यश संपादन करता आलेले नाही. तरीसुद्धा काँग्रेसचे अनेक मान्यवर त्यांच्या भेटीसाठी आले होते. पण, कोणतेही राजकीय नेत्यांची त्यांनी संपर्क साधला नाही. भेट घेतली नाही.
महाबळेश्वरच्या अतिवृष्टी व निसर्गरम्य परिसरात पर्यटनासाठी अनेक जण भेट देतात. खा. राहुल गांधी यांनी महाबळेश्वरला भेट दिली पण पोलीस बंदोबस्त वगळता फारसं काही प्रसारमाध्यमाच्या हाती आले नाही. दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड येथील प्राथमिक शाळेला क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली. ही भेट त्यांनी कुटुंबीय समवेत दिली. प्राथमिक शाळेतील शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमुराद संवाद साधला. पण, प्रसार माध्यमाशी ते काही बोलले नाही.
वास्तविक पाहता अतिवृष्टीच्या महाबळेश्वर तालुक्यात खासदार राहुल गांधी आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची नोंद असलेल्या प्रतापगडला भेट दिली असती तर नक्की त्यांना त्यांची आजी व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्याची ओळख पटली असती. परंतु, आपल्या धावत्या दौऱ्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
लोकसभेचे अधिवेशन सुरू असून याबाबतही त्यांनी मौन पाळणे पसंद केले. त्या मानाने सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व सौ. डॉ .अंजली तेंडुलकर यांनी माण तालुक्यातील गोरगरिबांच्या मुलांसोबत तेवढ्याच तळमळतेने वेळ घालवला. याची मात्र नोंद झाली आहे. वेगळ्या बातमीची उब मिळावी म्हणून अनेक जण थंडी गारठ्यात महाबळेश्वरला आले होते. त्यांची घोर निराशा झाली.
फोटो-महाबळेश्वर येथील खासदार राहुल गांधी व माण तालुक्यात भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (छाया- अजित जगताप, सातारा)