Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रभाजप सातारा जिल्हाध्यक्षाचा वाढला थाट.. निवडून आले आठचे आठ…

भाजप सातारा जिल्हाध्यक्षाचा वाढला थाट.. निवडून आले आठचे आठ…

सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक क्रांती झालेली आहे. महायुतीचे आठ उमेदवार विक्रमी मताने निवडून आले. त्यापैकी चार जणांना मंत्रिमंडळात वर्णी लागली. याची इतिहासात नोंद झालेली आहे. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना १ लाख ४२ हजार १२४, माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे ४९ हजार ६७५ व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वाई मतदार संघातील आमदार मकरंद पाटील ६१हजार ३९२ आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री आमदार शंभूराज देसाई ३४ हजार ८२४ मताधिक्या मिळवून निवडून आले आहेत. त्याचबरोबर फलटण आ .सचिन पाटील, कोरेगाव आ.महेश शिंदे, कराड उत्तर आ. मनोज घोरपडे व कराड दक्षिण आ. डॉ. अतुल भोसले हे सुद्धा विजय झालेले आहेत. यापैकी कोरेगावचे शिवसेनेचे आ. शिंदे यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पाच लाल दिव्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. आणि या बहुमूल्य कामगिरीसाठी भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांचे खूप मोठे योगदान आहे. या मंत्रिमंडळासाठी सर्वात मास्टर स्ट्रोक मारणारे भाजपचे खा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा करिष्मा महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, गृहमंत्री स्वर्गीय बाळासाहेब देसाई, मालोजीराव नाईक निंबाळकर, यशवंतराव मोहिते, श्रीमती प्रमिला काकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. शालिनीताई पाटील, भाऊसाहेब गुदगे , बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, एकनाथ शिंदे, भि.दा .भिलारे, एन. एम. कांबळे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मदनराव पिसाळ, अशा अनेकांनी सातारा जिल्ह्यात लाल दिवा आणलेला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जयसिंगराव फरांदे, हेमलता ननावरे, अरुणादेवी पिसाळ, ज्योती जाधव यांनी सुद्धा लाल दिवा फिरवला आहे. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर सातारा जिल्ह्यात लाल दिव्याचे आगमन होत आहे. त्यामुळे मोठ्या जय्यत सत्काराचाही कार्यक्रम आखला जाणार आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष असून सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनासुद्धा विधानपरिषद घेऊन त्यांचाही यथोचित सत्कार करावा अशी मागणी सातारा जिल्ह्यातील भाजप प्रेमी तसेच महायुतीच्या कट्टर समर्थकांनी केलेली आहे. त्याबाबतही चांगली बातमी मिळेल. अशी अपेक्षा भाजप निष्ठावंतांनीही व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments