मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आगामी २०२५ सालच्या दिनदर्शिकेसाठी छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 12 महिन्यासाठी १२ छायाचित्रांची निवड करण्यात आली. त्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. एकूण २८० फोटोतून ही १२ छायाचित्रे निवडण्यात आली. त्यापैकी कुणाल पाटील आणि संतोष नागवेकर यांची प्रत्येकी २ छायाचित्रे निवडण्यात आली.
या स्पर्धेसाठी सिने डायरेक्टर महेश लिमये, ज्येष्ठ छायाचित्रकार विकास खोत आणि क्युरेटर अलीफ़िया वाहनवटी यांची निवड समिती नेमण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रुमख संयोजक म्हणून अंशुमन पोयरेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील सहभागी २८० फोटोतून ही अंतिम १२ छायाचित्रे मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेसाठी निवडण्यात आली. निवडप्रक्रिया पारदर्शक राहावी म्हणून तीनही सदस्यांना छायाचित्रकारांचे फोटो कोणत्याही माहितीशिवाय देण्यात आले होते. त्यातून हे १२ फोटो 12 महिन्यांच्या संकल्पनेवर
निवडण्यात आले. या फोटोंचा समावेश असलेली दिनदर्शिका मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना विनामूल्य देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
या छायाचित्र स्पर्धेत विजेते ठरलेले छायाचित्रकार पुढीलप्रमाणे : आशीष राणे, संतोष नागवेकर, सतेज शिंदे, एम्यान्यूअल कारभारी, अतुल कांबळे, राजू शिंदे, संदीप पागडे, सत्यजित देसाई, प्रशांत अंकुशराव, कुणाल पाटील.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेत मुंबईचा ‘ठसा’छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर
RELATED ARTICLES