Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमौजे घोगाव कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ बकऱ्यावर प्राणघातक हल्ला;बिबट्याचा बंदोबस्त करण्याची...

मौजे घोगाव कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ बकऱ्यावर प्राणघातक हल्ला;बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जनतेची मागणी


प्रतिनिधी (प्रताप भणगे) : घोगाव तालुका कराड येथे शुक्रवारी (१३डिसेंबर) रोजी रात्री बिबट्याने पाटील मळी शिवारामध्ये शेतामध्ये बसवण्यात आलेल्या मेंढ्यांच्या कळपाच्या वर हल्ला केला .या हल्ल्यामध्ये सुमारे १३ शेळ्या छोटी बकरी ठार झालेली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मेंढपाळांचं नुकसान झालेलं आहे.
मान्सून संपल्यानंतर दिवाळीनंतर सर्व मेंढपाळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतामध्ये आपल्या मेंढ्या चरण्यासाठी व शेत शिवार मध्ये खत देण्यासाठी बसवण्यासाठी येत असतात त्यांचा मुक्काम नेहमीच शेत शिवारात उघड्यावरच होत असतो. यामध्ये संपूर्ण मेंढपाळांचं कुटुंब उघड्यावर तीच आपला संसार करत असून मोकळ्या झालेल्या शेतामध्ये वाघर म्हणजेच नेट लावून या मेंढ्या रात्री शेतकऱ्यांच्या परवानगीने शेतामध्ये बसवण्यात येत असतात. हे मेंढपाळ नेहमीच आपल्या मेंढ्या दिवसभर चरण्यासाठी गावातीलच डोंगर ,मोकळा पट्टा या ठिकाणी चारण्यासाठी घेऊन जातात आणि सायंकाळी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसवायच्या आहेत या ठिकाणी येत असतात. यांचे ठिकाण नेहमीच दिवसाला बदलत असते.हे सर्व मेंढपाळ शेतकऱ्यांना शेतामध्ये खत उपलब्ध होण्यासाठी आपल्या मेंढ्या बसवण्यासाठी नेहमीच वर्षांवर्षांपासून येत असतात. परंतु शासनाने वन्यप्राणी संरक्षण कायदा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडी त्याचबरोबर बागायती पट्टा वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड दक्षिण हा भाग तसा डोंगराळ भाग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्यांची, वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा वनीकरण विभाग शेतकऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज पर्यंत अपयशी ठरलेला आहे . मागील आठवड्यात उंडाळ्यामध्ये भर रस्त्यामध्ये टू व्हीलर च्या पाठलाग करून बिबट्याने पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्यांचा चावा घेतलेला होता. यामध्ये विद्यार्थी जखमी झाला होता तर काल रात्री घोगाव येथे मेंढपाळांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला होऊन अशा पद्धतीने मेंढ्या मारलेल्या आहेत.
ही सर्व घटना पाहता वनीकरण विभागाने या सर्व बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी जोरदार मागणी लोकांमधून होत आहे. शेतकरी आपल्या शेताला पाणी देण्यासाठी नेहमीच रात्री अपरात्री आपल्या शेतामध्ये जात असतो अलीकडेच बिबट्याचे हल्ले माणसांवर सुद्धा वाढले असून संपूर्ण शेतकरी वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग आपला जीव मुठीत घेऊन या संपूर्ण विभागात जात असतो. याची दखल घ्यायला हवी आज जो घोगाव मधील बिबट्याचा हल्ल्यामध्ये दगावलेल्या या मेंढ्यांचं वनीकरणाचे अधिकारी व पोलिसांच्या माध्यमातून पंचनामा सुरू असून याबाबत तातडीने शासनाने योग्य ती पावले उचलावीत आणि संपूर्ण या विभागात बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच हे जे नुकसान झालेलं आहे याची ताबडतोब नुकसान भरपाई या मेंढपाळांना द्यावी अशी मागणी जनतेमधून आणि मेंढपाळांमधून होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments