कास (विशेष प्रतिनिधी) : छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली तालुक्यातील मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात गुन्हा घडलेला आहे. एकीवच्या ऐकीव बातमीच्या दुसरी बाजू कधी अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.
गु.नं व कलम गु.नं. २०३/२०२४भारतीय न्यात संहिता कलम१०९,११७(२)(३)(४)११५(२),३५२,३५१(२)(३)३२४(४) ,१८९(२)१९१(२)(३)१९० कलमानुसार दोन दिवसांपूर्वी एक गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा ध्वज दिन शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला होता .
मौजे एकीव ता. जावली जि. सातारा गावच्या हद्दीत जय मल्हार हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेची दखल स्वदेशी दिन गुरुवार दि: १२ डिसेंबर रोजी घेण्यात आली. एकीव गाव आड बाजूला असल्यामुळे इंटरनेटच्या जमान्यात ही माहिती अनेकांना लगेच पोहोचली नाही. त्यामुळे या घटनेबाबत जसे हत्तीचे वर्णन करतो. तसा प्रकार काही माध्यमांच्या फॉरवर्ड बातम्यांनी दिसून आला.
मुळातच फिर्यादी व आरोपी हे एकमेकांशी ओळखीचे नसल्यामुळे रेव्ह पार्टी होती की तोडपाण्याचा क्लायमॅक्स होता? हे पोलीस तपासात शोधून काढले पाहिजे. अशी मागणी पुढे आलेली आहे. काही लोकांच्या संभाषणातून याबाबत नक्कीच अधिक माहिती पोहोचेल. अशी आशा आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी भूमिकाही घेतली. त्याचे स्वागत होत आहे.
आरोपींमध्ये पाच नावासह अन्य साथीदार असं म्हटलेलं आहे. यामध्ये नेमके किती जण उपस्थित होते?. हे न्यायालयात सिद्ध होईलच. तूर्त अनेक घटना घडतच राहतात. पुढे त्याचा विसर पडतो पण काही बाजू पुढे येतच नाही.
सातारा जिल्ह्यातील एका सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमाबाबत विधिमंडळातही आवाज उठवण्यात आला होता. परंतु, त्यानंतर सर्व काही आरामदायक कार्यक्रम सुरू झाले आहेत. हा त्यातीलच प्रकार असला तरी तरुणांच्या मारामारी नंतर नृत्यांगना व हॉटेल मालकाची बाजू सेफ झाली. जे गुन्हेगार आहेत. त्यांना शिक्षा व्हावी. हे सुद्धा खरे आहे.
जिसने पाप ना किया है,,वो पहिला पत्थर मारे. हा नियम सुद्धा अनेकांना आता शिकवण्याची वेळ आलेली आहे. कास पठारावरील हॉटेल बाबत अनेकदा तक्रारी झालेली आहेत. तरीसुद्धा तो कार्यक्रम सुरूच आहे. मेढा पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केलेला आहे. या तपासाला पूर्णविराम भेटू नये. हीच माफक अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. कारण, सातारा जिल्ह्यात जिथे जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तक्रार होत आहे. तिथे इतर बाबी बद्दल न बोललेलं बरे असाही सुरू उमटत आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरापराधीला शिक्षा होऊ नये. हे ऐकले होते .आता काही न्यायची भाषा करत असतील? तर त्याचाही विचार व्हावा. अशी आता सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू झालेली आहे. एकीव येथील ऐकीव घटना क्रम सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे. त्याबाबत सत्यप्रकाश टाकणे गरजेचे वाटत आहे.
फोटो -कास पठारावरील बहु चर्चित जय मल्हार हॉटेल