प्रतिनिधी(प्रताप भणगे) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कराड येथे नवीन महिलांसाठी शंभर बेडचा हॉस्पिटल बांधकाम करण्यासाठी २८ कोटी १६ लाख १५ हजार ४८३ रुपये मंजूर झालेत. याचे कंत्राट मे शहा कंस्ट्रक्शन कंपनीस देण्यात आलेले आहे. २० एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या वर्क ऑर्डर नुसार संबंधित ठेकेदार कंपनीने ४०० (दीड वर्षे) दिवसात काम पूर्ण करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र ६०० (दोन वर्षे) दिवस उलटले तरी सदरचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही याबाबत संबंधित ठेकेदर कंपनी व आरोग्य प्रशासनाचा विचारले असता या कामासाठी निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात येत आहे. मुळातच हे काम देताना ठेकेदाराला मूळ अंदाजपत्रकाच्या ४.७५ % म्हणजे एक कोटी ३३ लाख ७६ हजार ८३० रुपये ज्यादा दराने काम मंजूर केले आहे. असे असतानाही हे काम रखडत पडले आहे. त्यामुळे कराड सह पाटण खटाव कडेगाव चार ते पाच तालुक्याचा रुग्णांना सेवा मिळत नाही. त्यामुळे तातडीने अंदाजपत्रकांनुसार निधी उपलब्ध करून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच सदरच्या कामाची मुदत संपली तरी काम पूर्ण झाले नाही याची सखोल चौकशी करावी व अर्धवट असलेल्या कामाला जबाबदार असलेले अधिकारी कर्मचारी व ठेकेदार कंपनी यांच्या विरोधात कायदेशीर कड़क कारवाई करावी. अन्यथा आपल्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना मनोज माळी, शिवाजी चव्हाण, शुभम उबाळे, भानुदास डाइंगडे, बंटी भाऊ मोरे, प्रितेश माने, एजाज काजी, बबलू गडाकुश, गणेश नायकवडी इत्यादी उपस्थित होते.
#https://youtu.be/QHjL-LhXCuk?si=LlkOLWD0qTzKYJAw