Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रस्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर; डॉ निळकंठ धारेश्वर महाराज, पत्रकार गजानन तुपे,भीमराव...

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर; डॉ निळकंठ धारेश्वर महाराज, पत्रकार गजानन तुपे,भीमराव धुळप, रुग्णसेवक मंगेश चिवटे,भास्कर तरे, पार्श्वगायिका कविता राम यांचा समावेश

प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येणार आहे.
स्पंदन जीवन गौरव पुरस्कार यावर्षी श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज (मठाधिपती आदिमठ संस्थान धारेश्वर) यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे आले आहे.
2024 मधील पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे डाॅ.संदीप डाकवे यांनी केली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून यासंदर्भात प्रस्ताव मागवण्यात आले होते. सुमारे 200 प्रस्तावामधून 35 व्यक्ती व संस्था यांची निवड केली आहे.
सदरील पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. यावर्शी भिमराव धुळप, ज्ञानेश्वर जाधव, जीवन पाटील, सौ.माधुरी जाधव, अपर्णा शेंडे, वैशाली पवार, श्रीरंग चव्हाण, सौ.अनिता गोरे, सौ.शुभांगी शिंदे, डाॅ.उमेश साळुंखे, मालन जाधव, स्वप्नाली सुर्यवंशी, चंद्रशेखर तांदळे, कु.अन्वी घाटगे, बी.एस.पवार, भास्कर तरे, इंद्रधनू विचारमंच फौंडेशन, निरंजन पवार, दिनकर पाटील, धनाजी मोहिते, चंद्रकांत गंगावणे, विकास देसाई, रणजीत भोगल, रोहित जंगम, सावली जेष्ठ नागरिक सामाजिक संस्था यांचा प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड ने सन्मान केला जाणार आहे.
याशिवाय याच कार्यक्रमात राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार विजेते साहित्यिक, स्पंदन दिवाळी अंक स्पर्धा 2023 आणि 2024 मधील विजेते, सेल्फी विथ गुढी स्पर्धा 2024 मधील विजेतेे यांचाही सन्मान केला जाणार आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.21 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम, सुप्रसिध्द मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, सुप्रसिध्द अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगिता साळुंखे, कराड शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक सौ.रेखा देशपांडे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अमृता उत्तेरवार, अभिनेत्री मनिषा मोरे, अभिनेत्री काजल राऊत उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments