Sunday, December 15, 2024
घरआरोग्यविषयकआरोग्यसेवक मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी पुन्हा मिळावी

आरोग्यसेवक मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी पुन्हा मिळावी

प्रतिनिधी : राज्यभरातील गोरगरिब व गरजू रूग्णांसाठी संजीवनी ठरलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला लोकभिमुख करत त्या माध्यमातून आपल्या कार्याचा एक आगळा वेगळा ठसा मंगेश चिवटे यांनी आपल्या रूग्णसेवेच्या माध्यमतून उमटविला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मृत अवस्थेत पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पहिल्या दिवसापासून जनमानसात प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पोहचविण्याचे काम ज्याने केले ते म्हणजे मंगेश चिवटे साहेब. राज्याचे तात्कालिन संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात अवघ्या २.५ वर्षांच्या सरकारमध्ये ४१९ कोटी पेक्षा जास्त निधी हा वैद्यकीय उपचारासाठी गोरगरीब गरजू रुग्णांना मिळवून देवून जगभरात एक आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच करमाळ्याचे मंगेश चिबटे. जात-धर्म-पक्ष-पंथ न पाहता किंवा कोणताही पक्ष न पाहता या व्यक्तीने हजारो शेकडो रुग्णांना निधी मिळवून देण्यासाठी स्वतः हाच्या आरोग्याची काळजी कधी या वितरित केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या रुग्णसेवीची दखल राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी वेळोवेळी घेतली. अडीच वर्षाच्या कार्याकाळात या कक्षाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी वैद्यकीय कक्षाच्या सीमा रुंदावल्या. अनेक गोरगरिब व गरजू रूग्णांसाठी देवदूत ठरलेले मंगेश चिवटे यांनी समर्पितपणे वैद्यकीय मदत निधी

कक्षाचे कामकाज बघितले. गरजूंना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी काळ वेळ सण न बघता रूग्णसेवेला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून रूग्णांच्या मदतीसाठी ३८१ कोटीहून अधिक तर नैसर्गिक आपत्ती साठी ३८ कोटीहून अधिक अर्थसहाय्य वितरित करता आले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये अनेक विविध आजारांचा समावेश करण्यात आला अर्थात त्यांसाठी पाठपुरावा मंगेश चिवटे यांचा होता हे वेगळे सांगायला नको.रूग्णसेवेसाठी समर्पितपणे जीवन जगणाऱ्या आरोग्यसेवकाकडे पुन्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची जबाबदारी मिळाला हवी अशी भावना राज्यभरातील नागरिकांची आहे..

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments