मुंबई – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे इंदु मिल स्थळी आंतरराष्ट्रीय भव्य स्मारक उभारण्यात येत असून या स्मारकात जगातील सर्वात उंच डॉ बाबसाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येत आहे. त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चैत्यभूमी स्मारकचा पवित्र स्तूप दीक्षाभूमी सारखा भव्य उभारण्यात आला पाहिजे.त्यासाठी आंबेडकर कुटुंबीयांशी सरकार ने समाधानकारक चर्चा करून पवित्र चैत्यभूमी चा स्तूप दीक्षाभूमी सारखा भव्य उभारावा अशी आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी राज्यभरातील सर्व प्रमूख रिपब्लिकन कार्यकर्ते विचार मंचावर उपस्थीत होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष आपण सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन साकार करीत आहोत.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आम्ही देशभर पोहोचवला आहे.आंबेडकरी जनतेची राज्यात ताकद आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष साकार करून सत्ता हस्तगत करण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे आवश्यक आहे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
इंदुमील स्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून लवकरच या स्मारकाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असे ना.रामदास आठवले यांनी यावेळी सांगीतले.