Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रपांचगणीतील बिलिमोरीया हायस्कूलमध्ये ' आरंभ ' ; फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन : डान्स..भारतीय...

पांचगणीतील बिलिमोरीया हायस्कूलमध्ये ‘ आरंभ ‘ ; फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन : डान्स..भारतीय संस्कृती..कलाकारी…खवय्येगिरी आणि बरेच काही.


पांचगणी : कृतियुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण हा अध्ययन अनुभव देणाऱ्या बिलिमोरिया हायस्कूलने विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित केलेल्या ‘आरंभ २०२४ ‘- फेस्टिव्हलचे आज शानदार उद्घाटन झाले.

आदिती एज्युकेशन संस्थेच्या बीलिमोरिया हायस्कूल कार्यकारी संचालीका आदिती गोराडीया, मुख्य व्यवस्थापक पंकज चव्हाण मुख्याध्यापक विशाल कानडे , शैक्षणिक संचालक गणेश फरांदे, कार्यकारी संचालक पियूष कामदार व पालक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. हा फेस्टीव्हल तीन दिवस चालणार असून पालक वर्गही मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून याचा लाभ सर्व पांचगणीकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी आदिती गोराडिया यांनी केले.

आज झालेल्या कार्यक्रमात आर्टिस्ट एंटरटेनिंग मध्ये मुकिम तांबोळी यांनी चित्रकलेची ओळख करून देताना गीतातून आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून चित्रकला कशी रेखाटली जाते याची अनुभूती दिली . तर ॲनिमल रेस्क्यू टीमचे प्रमुख निहाल बागवान यांनी पांचगणी आणि प्राणी यांची लोकसहभागातून माहिती दिली. त्यानंतर बिलिमोरियां स्कूल ने प्रोत्साहित केलेल्या घाटजाई विद्यामंदिरातील मुलींनी केलेला डान्स सर्वानाच मोहवून गेला

याबरोबरच येथे उभारलेला विविध स्टॉल्स वर विविध पदार्थ खाण्यासाठी पालक व विद्यार्थी तसेच नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती. आजचा महोत्सवाचा पहिला दिवस होता उद्या पासून हा कार्यक्रम आणखी रंगात येणार आहे.

उद्याचे कार्यक्रम….
बोलक्या बाहुल्या (मयुरेश), मानसिकता (विनय काप्री ) , तबला मेस्ट्रो (संजय अपार), म्युसिशियन (नॅथन इमॅन्युएल), सिंगर (आदी राव) , म्युसिशियन (तेजस) , ड्रम सर्कल (बिल्लीमोरिया हायस्कूल), म्युसिशियन (निखिल ) , सिटारिस्ट (उस्ताद रईस खान), बोलक्या बाहुल्या (योकी राव), म्युसिशियन (कॉर्ल्टन ब्रगांझा ) , राईटर फिल्मस्टार (नितीन भिलारे), इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल , ॲक्टर, राईटर, फिल्म मेकर (अमीन हाजी ) या मान्यवर कलाकारांचे स्टेज शो होणार आहेत.

प्रतिक्रिया
दीपक येळवंडे, चाकण पुणे
अलीकडच्या काळात शिक्षणाच्या संकल्पना बदलत असताना विद्यार्थांना त्यात सामावून घेण्यासाठी आनंददायी शिक्षण ही काळाची गरज असून ही संकल्पना बिलिमोरीया स्कूल राबवण्याचा प्रयत्न करीत आहे हे खरोखरच मुलांना उपयुक्त असेच आहे. यामुळे भावी कलाकार, तंत्रज्ञ, अधिकारी होण्यासाठी मदत होणार आहे.

सहभागी स्टॉल्स…
बिलीमोरया हायस्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी बनवलेल्या बांबू पासून विविध वस्तू ,कलाकुसर केलेल्या वस्तू, कापड कला तसेच पेंटिंग, चित्रकला, कप प्रिंटिंग, बनियान प्रिंटिंग तसेच शहरातील विविध व्यावसायिक स्टॉल्स आइस्क्रीम, चने, तसेच विविध प्रकारचे पदार्थांचे स्टॉल्स आहेत.

सोबत फोटो आहेत
१) पांचगणी : आरंभ फेस्टिव्हलचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना आदिती गोराडिया, शेजारी पियूष कामदार, विशाल कानडे व इतर २) घाटजाई विद्यामंदिरातील मुलींचा डान्स व तिसऱ्या छायाचित्रात महोत्सवातील गर्दी (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments