Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात महामानवाला अभिवादनासाठी विधायक उपक्रम

साताऱ्यात महामानवाला अभिवादनासाठी विधायक उपक्रम


सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शाळा प्रवेश झाला. त्या सातारा नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. महामानवांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण सातारा नगरीमध्ये त्रिशरणव- पंचशील ग्रहण करून विविध बुद्ध विहारात प्रार्थना घेण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार वाड्या वस्ती मधील सार्वजनिक ठिकाणी डॉ. आंबेडकर यांची प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील श्री पुरुष यांच्यासाठी संविधानाच्या माध्यमातून हक्क अबाधित राखले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करणे. हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे अशी अपेक्षा सौ उषा लक्ष्मण उबाळे व अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. .
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर, सार्वजनिक वाचनालयाला पुस्तक भेट व अन्नदान व शीतपेय वाटप करण्यात आले. आज सकाळपासूनच सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्व समाजातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. सातारा नगरपालिकेच्या वतीने मुख्य अधिकारी अभिजीत बापट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दादासाहेब ओव्हाळ ,जेष्ठ उपासिका सौ मीनाताई इंजे, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप ,सामाजिक कार्यकर्ते प्रज्वल मोरे, मिलिंद कांबळे, प्राध्यापक डॉ. अरुण गाडे, लक्ष्मण उबाळे, रमेश जाधव, भदंत दीपंकर, अमोल गंगावणे, संदीप भाऊ शिंदे, अरविंद दामले, मधुकर आठवले, सिद्धार्थ कांबळे, विजय ओव्हाळ, अमोल पाटोळे, अमर गायकवाड, उमेश लांडगे, प्रकाश वायदंडे, प्रवीण धसके, उमेश खंडझोडे, भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, त्रिलोक्य बौद्ध महासंघ , बौद्ध महासंघ , समता सैनिक दल ,वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सातारा नगरपरिषद यांच्यासह मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. सातारा शहर व परिसरातील अनेक बौद्ध बंधू व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मेणबत्ती पेटवून आपल्या भाग्यविधात्याचे स्मरण केले. यावेळी समाजातील अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ज्योत तेवत ठेवण्याची भीम प्रतिज्ञा केली. तसेच परिसरात युगपुरुषांच्या जयघोष करण्यात आला.

फोटो- सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना नगरपरिषद मुख्य अधिकारी अभिजीत बापट जेष्ठ पत्रकार अजित जगताप व दादासाहेब ओव्हाळ (छाया- अमोल गंगावणे, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments