प्रतिनिधी : गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ संस्थापक,प्रदेश अध्यक्ष दिपक भाऊ खोपकर यांच्या नेतृत्वा खाली दिनांक ६ डिसेंबर २०२४रोजी महामानव, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दीना निमित्त जगभरातून येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायी यांच्या सेवेत संघटनेच्या वतीने मोफत पाणी आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. हि संघटना सामाजिक, शैक्षणिक, अशा समाजपयोगी उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. आजही जगभरातून येणाऱ्या अनुयायांच्या सेवेत सहभागी झाले. यावेळी संघटनेचे महिला प्रदेश अध्यक्षा सौ मनीषा ताई ठवाळ, उपाध्यक्ष श्री सुनील नेटके, संघटक श्री, संतोष कारंडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन खरात, मुंबई विभाग / धारावी विभाग सर्व पदाधिकारी सेवेत उपस्थित होते. या पुढेही संघटना अशीच समाजपयोगी उपक्रम राबवत राहील असे संस्थापक,प्रदेश अध्यक्ष दिपक भाऊ खोपकर यांनी सांगितले.
गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत पाणी व अल्पोहर वाटप
RELATED ARTICLES