Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्र'निर्वाणी भीमराया' या एका वेगळ्या धाटणीच्या गाण्याद्वारे कोटी कोटी अभिवादन

‘निर्वाणी भीमराया’ या एका वेगळ्या धाटणीच्या गाण्याद्वारे कोटी कोटी अभिवादन

प्रतिनिधी : ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन…
विविध धर्म आणि संस्कृतींचा सुरेख मेळ असलेल्या आपल्या भारत देशामध्ये या विविधतेची दुहीसुद्धा होती. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करत ब्रिटिशांनी ही दुही वाढवण्याचेच काम केले. परंतु त्यांच्या विरुद्ध तत्त्वनिष्ठ, सनदशीर आणि क्रांतिकारक मार्गाने लढा देत भारतीय समाजाला केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत बनवण्यासाठी ज्या महामानवाने प्रयत्न केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. उच्चविद्याविभूषित अशी ही व्यक्ती कधीही केवळ स्वतःच्या स्वार्थापुरते काम करून पैशाने श्रीमंत होऊ शकली असती. परंतु बाबासाहेबांनी आपला उभा जन्म दलित, वंचित आणि उपेक्षितांसोबतच महिलांनाही न्याय हक्क मिळवून देण्यासाठी खर्च केला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत गणराज्याचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने
१९५६ साली आजच्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला… दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.
भीमराव चे कार्य, त्यांचे आपल्यावर असलेले उपकार, त्यांनी आपल्याला दिलेले संदेश यांची आठवण करून देणारी असंख्य भीमगीते आपण ऐकत आलो आहोत. मात्र आज, त्यांच्या योगदानाची आठवण करून, निर्वाणी भीमराया या एका वेगळ्या धाटणीच्या गाण्याद्वारे कोटी कोटी अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करूया.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments