
कराड(प्रताप भणगे) : श्री संत घाडगेनाथ हायस्कूल कोळे येथे चॅम्प्स ड्रॉइंग कॉम्पिटिशन व आयसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेमध्ये श्री संत घाडगेनाथ विद्यालयातील ११६ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून उत्तेजनार्थ वेदांत हनुमंत शिंगण इयत्ता दहावी यास मेडल रोख रक्कम ५०० रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.
त्याचबरोबर मोठ्या गटातून उत्तेजनार्थ कु. वेदांती आबासो पाटील या विद्यार्थिनीला मेडल व रोख रक्कम ५०० रुपयांचे बक्षीस मिळाले.
लहान गटातून उत्तेजनार्थ आयुष सुनील चव्हाण इयत्ता पाचवी या विद्यार्थ्याला मेडल व रोख रक्कम ५०० रुपयांचे बक्षीस मिळाले.
लहान गटातून उत्तेजनार्थ वेदांतिका अरविंद देशमुख इयत्ता सातवी या विद्यार्थिनीला मेडल व रोख रक्कम ५०० रुपयांचे बक्षीस मिळाले.
सातारा जिल्हा विभागीय उत्तेजनार्थ क्रमांक कु. आर्या सुरेश पाटील हिला मेडल, ट्रॉफी व रोख रकमेचे पारितोषिक २५०० रुपयांचे मिळाले.
त्याचबरोबर कु.प्राची संतोष भोसले हिला मेडल, ट्रॉफी व रोख रकमेची पारितोषिक २५०० हजार रुपयांची मिळाले. बक्षीस वितरण इयत्ता दहावीतील पालकांच्या शुभ हस्ते करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक परशुराम डाळे संगणक शिक्षक सचिन शिंदे यांचे सहकार्य लाभले.
प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी तर आभार सविता कदम यांनी मानले.