मुंबई:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला.उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा अनुयायांना मिळतात की नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विवेक गायकवाड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज ! कोकण विभागीय आयुक्तांकडून सोयीसुविधांची पाहणी
RELATED ARTICLES