सातारा(अजित जगताप) : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना १ लाख ४२ हजार २१४ असे विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. यासाठी निस्वार्थी कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा मोबदला घेतला नाही. त्यांना भविष्यात चांगली संधी मिळावी. अशी रास्त मागणी भाजप तथा महायुतीचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी केली आहे.
सातारा तालुका व सातारा शहर तसेच जावळी तालुक्यातील अतिदुर्गम व मागास भागातील वाड्या वस्तीमध्ये कमळ चिन्ह पोहोचवण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. मेळावा- पदयात्रा- व्यक्तिगत संपर्क- कोपरा सभा- जाहीर सभा त्याचबरोबर महायुतीने दिलेली जबाबदारी समर्थपणाने पार पाडण्यासाठी स्वखर्चाने प्रयत्न केलेला आहे. पक्षीय पातळीवर आलेल्या निधीची वाट न पाहता आपलं कर्तव्य भावनेतून त्यांनी या निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवली आहे. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कुठेही बॅनर अथवा नामोल्लेख होऊ शकलेल्या नाही.
अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची नोंद पक्ष नेतृत्वापर्यंत गेलेली आहे. हा सुखद धक्का आहे. कोणत्याही स्वरूपाची समाज माध्यमावर क्रिया- प्रतिक्रिया न देता प्रामाणिकपणे प्रचार यंत्रणा राबविण्यात धन्यता मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत.
अशा निस्वार्थी भावनेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाच्या प्रथेनुसार निवडणुकीमध्ये खर्चा पाण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, काहींनी नम्रपणे तो निधी स्वीकारला नाही. ही बाब सुद्धा आता समोर आलेली आहे. या निधीचे पुढे काय झाले हे आजही गुलदस्त्यात आहे.
सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तसेच सातारा व जावळी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था, शासकीय राज्य कमिटी, सहकारी संस्था अशा ठिकाणी अशा कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक संधी द्यावी. यासाठी स्वतः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील राहतील. असा विश्वासही या निष्ठावंत गटाने बोलून दाखवलेला आहे. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये सामान्य मतदारांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवल्यामुळेच हे यश मिळाले आहे . त्याचबरोबर पक्षनिष्ठा महत्त्वाची मानून निस्वार्थीपणाने प्रचार यंत्रणा राबवणारे कार्यकर्ते यांचाही खारीचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घ्यावी. अशी मागणी निष्ठावतांनी उघडपणे केलेली आहे. यासाठी ते पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीत व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची मानणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जाऊ नये. यासाठी पक्ष नेतृत्व सुद्धा चांगला निर्णय घेतील. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ज्यांनी प्रामाणिकपणाने निस्वार्थीपणाने प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत. त्यांनी स्वतःचा नामोल्लेख टाळूनच ही माहिती दिलेली आहे. उत्कृष्ट दर्जाचे विकास कामे होण्यासाठी एक समिती स्थापन करून दूध का दूध और पानी का पानी… करण्याचाही मानस काहींनी बोलून दाखवला आहे. प्राचार यंत्रणेमध्ये कुठल्याही निधी न स्वीकारता कोरे राहूनही भक्कम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता चांगले दिवस येतील असे मानले जात आहे. विकास कामांचा निधी हा मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे. अन्यथा काहीजण या निधी आपल्या झोळीत भरण्याचा प्रयत्न कोणी करू नये. असे ही स्पष्ट केले आहे.
सातारा जावळीत निस्वार्थी कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी
RELATED ARTICLES