प्रतिनिधी – महाराष्ट्रात प्रत्येक देवदेवतांचे अनेक वेगवेगळे भक्त आहेत. कोण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी, शिर्डीच्या साईचा,डोंगरचा जोतिबा,श्री स्वामी समर्थ,बालाजी,मुंबईचे सिद्धिविनायक,मुंबादेवी अशी कितीतरी देवस्थान आहेत.अनेकांचे कुलस्वामी,कुलदैवत देखील आहेत. मात्र सध्या अनेक ठिकाणी ‘प्रसादालय’ म्हणून जो भाविकांना प्रसाद म्हणून कमी किमतीत दोन लाडू, खोबरे वडी, साखर पीठ गोळी असे पदार्थ दिले जात असतात.त्यासाठी प्रत्येक देवस्थान टेंडर प्रणाली राबवून जे उत्तम पदार्थ बनवून देतील त्यांना हे काम दिले जाते. तो प्रसाद भाविक भक्त घेत असतात, मात्र तरीही बाहेरील दुकानातून आजू बाजूच्या लोकांना देवाचा प्रसाद म्हणून काही लोक देवदर्शन करून गेल्यावर तो प्रसाद देत असतात.
मात्र कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात जी दुकाने आहेत त्याठिकाणी जो प्रसाद विकत दिला जात आहे. तो निव्वळ खराब दर्जाचा आहे.यामध्ये आपण शेतात पिकवत असलेले भाताची टरफले,अक्के भातकूट बघायला मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे ही बाब प्रशासनाने लक्षात घेऊन वेळीच दखल घ्यावी. श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट सुद्धा याबाबत कठोर पाऊले उचलावी अशी मागणी समस्त भक्तगण करत आहेत.
कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या मंदिराबाहेरील दुकानात प्रसादात भाताची टरफले
RELATED ARTICLES