Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रधनंजय चंद्रचूड यांनी लोकशाहीचा गळा घोटला'; पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका...

धनंजय चंद्रचूड यांनी लोकशाहीचा गळा घोटला’; पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका…

प्रतिनिधी : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण निर्णय न घेऊन त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. “पक्षांतर बंदी कायद्याचा सर्वात मोठा निर्णय होता, तो झाला नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच “लोकशाहीचा जर खून झाला तर संविधानाला काही अर्थ राहणार नाही”, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “भारतीय लोकशाही बळकट असली पाहिजे असं सर्वांचं मत आहे. प्रत्येकाच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी निवडणूक आयुक्त नेमण्याचा कायदा बदलला. तक्रार करायची कोणाकडे? निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण त्यांच्यावर विश्वास राहिला नाही”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
या देशातील लोकशाही सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण काम करतोय. त्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालाय. विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. आणीबाणी बद्दल अनेक वेळा काँग्रेसने माफी मागितली आहे. या निवडणुकीत विरोधात वातावरण नव्हतं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. हरियाणा आणि महाराष्ट्रात जर भाजप विरोधात सत्ता गेली तर केंद्रातील सरकारला धोका होणार होता. निकाल लागल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. या देशात लोकशाही नांदत आहे हे सिद्ध करणं निवडणूक आयोग आणि सरकारची जबाबदारी आहे”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“माझा 2019 चा ईव्हीएम बद्दलचा माझा जुना व्हिडीओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्स मीटर आणि रिसिव्हर नाही अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही ,असं माझं मत त्यावेळी होतं. जगात अशी मशीन कुठेही निवडणुकीसाठी वापरली जात नाही. माझी मागणी अशी आहे, 100 टक्के VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे करा. तुम्ही जर केलं नाही तर संशय वाढणार आहे”, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

1991 ला सोनिया गांधींनी इच्छा व्यक्त केली असती तर त्या पंतप्रधान झाल्या असत्या. त्यांनी पुढे 1999 ला पक्ष वाचवण्यासाठी जबाबदारी घेतली. 1991 ला आणि 2004 ला दोन वेळा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या. पण त्यांनी त्याग केला. नंतर खोटं लिहिलं गेलं फाईल सोनिया गांधींकडे जायच्या, हे सगळं खोटं आहे. मी 24 तास पंतप्रधान कार्यालयात असायचो. फाईल बद्दल बोललं गेलं ते अतिशय पोरकट आणि एका मीडिया सल्लागाराने खोडसाळ पणे लिहिलं मी तिथं होतो. एकदा महत्वाचा निर्णय असेल तर विचारलं जात होतं. मी 6 वर्ष दिल्लीत असताना सोनिया गांधीना जवळून पाहिलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत देखील पहिली. सोनिया गांधी चर्चा करून निर्णय घायच्या त्या आपला निर्णय कधी लादत नव्हत्या. माहिती अधिकार कायद्याला प्रणव मुखर्जीनी फार विरोध केला. मात्र सोनिया गांधींमुळे हा कायदा झाला”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments