प्रतिनिधी : नांदगाव ता.कराड येथील यश मारुती फाळके या तरुणाला काही वर्षांपूर्वी अपघाताने अपंगत्व आले.त्यामुळे या तरुणाला चालणे तर दूर पण हालचालही करणे अवघड बनले आहे. मोलमजुरी करणाऱ्या पालकांना त्याची देखभाल करतानाही अवघड जात आहे. ही बाब लक्षात घेऊन रघुनाथ महाराजांच्या यात्रेचे औचित्य साधत, सामाजिक बांधिलकीतून,’जनसेवा हिच ईश्वरसेवा’ मानून संबंधीत तरुणाला व्हीलचेअर देवून त्या परिवाराला दिलासा देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.वि.तु.सुकरे( गुरुजी) यांचे हस्ते व्हीलचेअर चे वितरण करण्यात आले.यावेळी त्याचे वडील मारुती फाळके, आई सौ. लता फाळके ,भाऊ अनिल फाळके यांच्या चेहऱ्यावर आनंद लपून राहिला नाही.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य इंजि. प्रशांत सुकरे,प्रा.संजय घाटे,उद्योजक जगन्नाथ कुचेकर, सुभाष पाटील (महाराष्ट्र पोलीस) ,सतीश कडोले, सुभाष पाटील(महाराज),प्रफुल्ल कुचेकर,विनायक कडोले, गणेश कडोले,मुरलीधर आमणे,राजेंद्र हावरे,शरद शिणगारे,तुळशिदास शेटे,संभाजी पाचंगे, भाग्येश पाटील, विजय घाटे,सुर्यकांत नलवडे, स्वप्नील पाटील,शिवप्रसाद शेटे,परेश शेटे, वैभव शेटे,संदीप हावरे,आकाश आरबुणे,शशिकांत माळी,आनंदा कुचेकर,निलेश माळी,निखिल कडोले, रोहित मुळीक,उदय चौधरी, संजय तलबार,प्रणव तांबवेकर,माणिक नगरे,धनाजी धारवट,रघुनाथ खिरवडे,मोहित सुकरे,देवेंद्र सुकरे आदी उपस्थित होते.