
सातारा(अजित जगताप) : शिक्षणमाता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यात क्रांती झाली आहे .प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी सौ. निशा राजेंद्र मुळीक यांची बँकेच्या शताब्दी महोत्सवानंतर निवड झाली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीचा येथोचित सत्कार झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा किरण यादव यांनी दिला होता. त्यापूर्वीच काही संचालकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून हा विश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभारात भ्रष्टाचाराचा आरोप करणारे एकमेकांच्या सोबती येऊन त्यांनी पुन्हा नव्याने आपला डाव मांडला. परंतु ,चेअरमन पदासाठी नाराजी नाट्य घडल्यामुळे अखेर सौ निशा राजेंद्र मुळीक यांना चेअरमन पदी निवड करण्याचे एक मताने ठरले. नूतन चेअरमन सौ निशा मुळीक यांचे पती राजेंद्र मुळीक यांनाही त्याबाबत मनस्वी आनंद झाला आहे. आज अनेक मान्यवरांनी प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन दालनात येऊन नूतन चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राथमिक शिक्षक बँकेच्या प्राथमिक शिक्षक संघ, समिती व इतर प्राथमिक शिक्षक संघटनेने सहकार्य केल्यामुळेच बँकेच्या शताब्दी वर्षानंतर महिला शिक्षक संचालकांना चेअरमन पदाची संधी मिळाली आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या पारदर्शक कारभार यापुढेही कायम ठेवला जाईल. बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून एका महिला चेअरमन कारकिर्दीमध्ये बँकेच्या प्रगतीचा वेग वाढवण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील तरफ येथे त्या प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पती राजेंद्र मुळीक यांची खंबीर साथ मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बँकेचे सर्व संचालक, शिक्षक संघटनेचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी सौ. निशा मुळीक यांची निवड झाल्याने सर्वांना मनस्वी आनंद झाला. तसेच कोणत्याही स्वरूपाचा अतिरेक न करता ही निवडणूक शांततेत पार पाडली. त्याबद्दल सर्व सभासदांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानले. यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी खाडे व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो -प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्यानंतर आनंद साजरा करताना चेअरमन निशा मुळीक व राजेंद्र मुळीक (छाया- अजित जगताप सातारा)