
मुंबई ( प्रतिनिधी मंगेश कवडे ) : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एसटीच्या तिकिटात आता वाढ होणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना लालपरीने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत.गेल्या तीन वर्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आले नसल्याचे कारण सांगत एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे.यामुळे आता एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून 14.3 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. म्हणजेच प्रवाशांना आता 100 रुपयांच्या तिकिटांमागे 15 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.तसेच एसटी महामंडळाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन शासनाकडे देखील पाठवला आहे. त्यामुळे आता महायुतीचे सरकार तो निर्णय मान्य करणार की फेटळून लावणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.