Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई शहर,ठाणे भिवंडी येथे १ व २ डिसेंबर २०२४ रोजी काही तांत्रिक...

मुंबई शहर,ठाणे भिवंडी येथे १ व २ डिसेंबर २०२४ रोजी काही तांत्रिक कामामुळे १०%पाणी कपात

प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये आज बिघाड झाला आहे. हे तांत्रिक दुरुस्तीचे काम ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर – उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला  होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

यास्तव दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०% कपात करण्यात येणार आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, ही नम्र विनंती करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments