मुंबई : राज्यातील निवडणुकीचे लागून आज जवळजवळ ७ दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही.त्यामुळे तर्कवितर्कांना जोर आला असतां महायुती सरकारचां शपथविधी अखेर ठरला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानामध्ये हा शपथविधी होणार आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने सत्तेत आलं तरी मुख्यमंत्रिपदाचं आणि शपथविधीचं काही ठरत नव्हते. या आधी शपथविधीच्या तारखा आणि ठिकाणांवर अनेकदा चर्चा झाल्या. पण आता शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महायुतीचे अखेर ठरलं ५ डिसेंबरला शपथविधी होणार
RELATED ARTICLES