प्रतिनिधी : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री सी.पी राधाकृष्णन साहेब यांच्या शुभहस्ते पार्श्वगायक पंडित सुरेशजी वाडकर यांच्या उपस्थितीत कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री.दत्तात्रय माने यांच्या संकल्पनेतून साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२४ चा मानाचा सन्मानाचा ITSF Award बालगंधर्व कला रत्न पुरस्कार लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे यांना राज्यपाल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रसिक मायबाप आणि परिवाराच्या आशीर्वादाने बहाल करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र भूषण अशोक मामा सराफ,सयाजी शिंदे,वैशाली सामंत,स्वप्नील बांदोडकर, पिहु आणि कुहू शर्मा,अंगद राज तसेच मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
