प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार विलेपार्ले, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, गायिका वैशाली सामंत. स्वप्निल बांदोडकर यांना देखील नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन साईदिशा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय माने व माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
अशोक सराफ, सयाजी शिंदे, शंकर महादेवन नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES