प्रतिनिधी : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुपारी दरे तालुका महाबळेश्वर या आपल्या मूळ गावी खाजगी हेलिकॉप्टरने आज आले. महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाला भरघोस मताधिक्य दिल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम श्री उत्तेश्वर देवस्थानला जाऊन श्री चे दर्शन घेतले. सर्वप्रथम त्यांनी दरे ग्रामस्थांची भेट घेऊन पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण जी प्रार्थना केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले. नवी दिल्ली येथे भाजपचे नेते यांची भेट घेण्यासाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणीस अजित पवार व एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्या. असं अमित शहा यांनी सांगितले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी आले . या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी काही काळ टीव्ही पुढे बसले. अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. अडीच वर्षाच्या काळामध्ये मला मुख्यमंत्रीपद मिळाले हाच गौरव आहे .महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काय निर्णय घेतला जाईल. तो मला मान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दौऱ्यामुळे दरे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. स्थानिक काही पत्रकारांशी त्यांनी आवर्जून संवाद साधला. एकूण मतदानाबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. उद्याचे तातडीने पुन्हा एकदा मुंबईला रवाना होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे भेटीने ग्रामस्थ सुखावले….
RELATED ARTICLES