Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग कणकवली येथे मुंबई पोलिसाची हत्या;पोलीस दलात खळबळ

सिंधुदुर्ग कणकवली येथे मुंबई पोलिसाची हत्या;पोलीस दलात खळबळ

सिंधुदुर्ग : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावी हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आते भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अवघा सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळोशी वरची वाडी येथील मुंबई येथील पोलीस कर्मचारी विनोद मधूकर आचरेकर (वय ५५) यांचा राहत्या घरात खून करण्यात आला आहे.पोलीस पाटील संजय गोरूले यांनी या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली आहे. कणकवलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी आढाव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या सगळ्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे. मूळचे सिंधुदुर्ग येथे असलेले आणि मुंबई पोलीस दलात असलेले विनोद आचरेकर कोळोशी गावी त्यांच्या रहात्या घरी एकटेच असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध आता पोलीस यंत्रणायुद्ध पातळीवर घेत आहे. कणकवली पोलीस उपनिरीक्षक हडळ आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचे पथक, डॉग स्क्वॉड या सगळ्या तपास यंत्रणांना पाचारण करण्यात आलं आहे. या प्रकरणात नवीन माहिती समजली असून ज्याची हत्या करण्यात आली, त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंबीय मुंबईतील भांडुप येथील वास्तव्यास आहेत. ते गावाला मुंबईतून घराची साफसफाई करण्यासाठी आले होते. कोळोशी परिसरात गावात असलेला त्याचा आते भाऊ याच्याबरोबर आचरेकर यांची काल रात्री दारु पार्टी झाली होती. मात्र, याचवेळी त्यांच्या काहीतरी वाद झाला आणि या वादातूनच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या हत्या प्रकरणात या पोलीस कर्मचाऱ्यांचा आतेभाऊ असलेला संशयित पेडणेकर याला कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे. कुऱ्हाडीचा वापर करून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचरेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई असं कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास आहे. या सगळ्या धक्कादायक राक्षसी कृत्याने परिसर हादरला आहे. आचरेकर यांनी मुंबई पोलीस दलातून त्यांनी निवृत्ती घेतली होती. ते मुंबई मरोळ येथील १९८९ च्या बॅचचे ते कर्मचारी होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments