Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रयेत्या रविवारी ६ वी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन

येत्या रविवारी ६ वी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी रिजवी ग्रुपच्या हेल्प युवरसेल्फ फाऊंडेशन द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्य (एम एम आर डी ए) ग्राउंड, बीकेसी येथे 6 वी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन
आयोजित करण्यात आली आहे. ऍडव्होकेट श्रीमती रुबिना अख्तर हसन रिझवी व डॉक्टर श्री अख्तर हसन रिजवी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम, कॅन्सर जनजागृती, पर्यावरणीय टिकाव, आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षीची थीम – “गो ग्रीन, प्लास्टिक-फ्री”, जागतिक शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. या मॅरेथॉनमध्ये विविध श्रेणीतील धावपटूंना सहभागी होण्याची संधी आहे, तसेच महिलांच्या सुरक्षिततेवर व सबलीकरणावर विशेष जनजागृती मोहीम राबवली जाईल.
या वर्षी, सहभागी होणाऱ्यांना अधिक सुरक्षितता आणि अनुभव सुधारण्यासाठी रूमी केअर ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपमधून रिअल-टाइम रेस ट्रॅकिंग, आपत्कालीन कार्ड आणि शाश्वत प्रगतीबाबत माहिती मिळेल. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अरबाज खान, अभिनेत्री स्वरा भास्कर, आणि ऑलिम्पिक धावपटू अक्षय खोठ उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या माध्यमातून जगभरातील लोकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी
आजच नोंदणी करा किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा. रूमी केअर ॲप डाउनलोड करा आणि आपत्कालीन कार्ड सक्रिय करून आपला अनुभव सुरक्षित आणि सोपा बनवा.
चला, कॅन्सर जनजागृतीसाठी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र येऊ या, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments