कोकण (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरूख एस. टी.आगाराच्या आगार व्यवस्थापक पदी रेश्मा दिपक मधाळे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांची सातारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी रेश्मा मधाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेश्मा दिपक मधाळे या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील असून त्यांच्या एसटी महामंडळा तील सेवेची सुरुवात सन २०११ मध्ये कोल्हापूरमधील कागल आगारात वाहतूक निरीक्षक पदापासून झाली. यानंतर त्या सन २०१६ मध्ये देवरुख आगारात सहाय्यक वाहतूक अधिक्षक म्हणून रुजू झाल्या. याठिकाणी त्यांनी ४ वर्षे सेवा बजावली.तर २०२० मध्ये दापोली आगारात आगार व्यवस्थापक म्हणून त्यांची बदली झाली.त्यांनी सर्व ठिकाणी उत्तम कामगिरी केली आहे.आतात्यांची देवरुख आगारात आगार व्यवस्थापक पदी नियुक्ती झाली आहे.
याबद्दल त्यांना विचारले असता आगारातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय ठेवून आधीच तोट्यातअसणाऱ्या या आगाराला तोट्या तून बाहेर काढून आगाराचे उत्पन्नवाढवण्या चे आपले प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. तसेच प्रवाशांना जलद व सुरक्षित सेवा देण्यावर आपला भर राहणार आहे.लांबपल्ल्या च्या गाड्या वाढविण्यात येणार आहेत.मद्यप्राशन करून कर्मचारी आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.पुढील काही दिवसांत आगाराला नवीन गाड्याही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.देवरुख एस. टी आगार व्यवस्थापक म्हणून त्या नव्याने रूजू झाल्याने त्यांचे देवरुख आगार मधील अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून स्वागत करण्यात आले.