Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात संबोधीची संविधान जागर व्याख्यानमाला

साताऱ्यात संबोधीची संविधान जागर व्याख्यानमाला

सातारा – भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवा निमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ३८ व्या वर्षाची थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला महात्मा फुले स्मृतिदिन २८ नोव्हेंबर ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन या कालावधीत ‘संविधान जागर’ या विषय सूत्रावर
होणार आहे.या व्याख्यानमालेची व मातोश्री भिमाबाई आंबेडकर २६ वा पुरस्कार वितरण समारंभाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.
नगरवाचनालयाच्या पाठक हाॅल मध्ये ही व्याख्यानमाला येत्या २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे. येत्या गुरुवारी २८ नोव्हेंबरला महात्मा फुले यांना अभिवादन करून पहिले पुष्प ‘भारतीय राष्ट्रवाद व संविधान’ या विषयावर जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ गुंफणार आहेत. दुसरे पुष्प शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी संविधानाचे अभ्यासक ,पुणे येथील आय एल एस लॉ कॉलेजचे प्राध्यापक डॉ.नितीश नवसागरे ‘एक देश एक निवडणूक ‘या विषयावर गुंफणार आहेत. शनिवारी ३० नोव्हेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. श्रीरंजन आवटे ‘मूलभूत हक्क व संविधान’ या विषयावर बोलणार आहेत. मंगळवारी ३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन ‘राष्ट्रवाद ,अल्पसंख्यांक व संविधान ‘तर बुधवारी ४ डिसेंबरला रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या राजशास्त्र विभागाचे प्रमुख शिवाजीराव पाटील ‘संविधान दुरुस्ती व न्यायव्यवस्था’ या विषयावर मांडणी करणार आहेत. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ.अशोक चौसाळकर ‘भारतीय संघराज्याची वाटचाल व संविधान’या विषयाने या व्याख्यानमालेचा समारोप करणार आहेत.
यावर्षीचा २६ वा मातोश्री भिमाबाई आंबेडकर पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार मंगल खिंवसरा, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यांना

रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिटर),छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे, असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य माजी अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे,कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ, सहकार्यवाह अनिल बनसोडे, कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त प्राचार्य डॉ.संजय कांबळे,प्रा. प्रशांत साळवे , डॉ.सुवर्णा यादव, यशपाल बनसोडे व प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments