प्रतिनिधी : वीज तज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे आज सोमवारी सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इचलकरंजीत निधन झाले.

प्रताप होगडे हे पूर्वीपासूनच धर्मनिरपेक्ष पक्षाशी जोडलेले होते,समाजवादी विचारसरणी तसेच ४० वर्षे जनता दल सेक्युलर या पक्षात विविध पदे घेतली.ते प्रधान सचिव म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले.मात्र माजी पंत्रधानपद एच डी देवेगौडा यांनी भाजपशी हातमिळवणी केली म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि समाजवादी पार्टी मध्ये प्रवेश केला.तेथे ते महाराष्ट्र कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत होते. वीजग्राहक संघटनेचे ते अध्यक्ष होते.विजेबाबत त्यांचा गाढा अभ्यास होता. मात्र त्यांची अलीकडे प्रकृती देखील ठीक नसत. सतत प्रवास पक्षाशी एकनिष्ठ,असलेले प्रताप होगाडे यांचे ईचलकरंजी येथे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करत आहेत.